पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर पायी चालत जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
उर्से : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पायी चालत जाणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय संतोष पाळेकर(वय २२. राहणार बारामती) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवार दिनांक ११जूना२०२५ रोजी रात्री उर्सै गावाजवळ झाला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ बगाड यांनी गुरुवार दिनांक १२जुन रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री अक्षय पाळेकर पुणे मुंबई द्रुतगती मार्गाने पायी चालत होता.उर्सै गावाजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात अक्षय याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.