सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.
तळेगाव दाभाडे :
दि.१३ तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या शारीरिक शिक्षणाच्या खेळाने सुरुवात करून विद्यार्थ्यां चे शाळेत टाळ्यांच्या गजरात आणि गाण्याच्या तालावर हसतमुखाने मुख्याध्यापिकांसोबत सर्व शिक्षकांनी स्वागत केले. डोरेमोन आणि मिकी माऊस हे कार्टून्स विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात केंद्रबिंदू ठरला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी रंगून गेले होते. नृत्य, नाटक, कविता याबरोबरच लाठी काठी आणि दानपट्टा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला. सेल्फी पॉईंटवर अनेक विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. कार्यक्रमानंतर पालक सभा घेऊन येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या सर्व बाबी पालकांना सांगण्यात आल्या. यावर्षी घेतल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींची ओळख पालकांना करून देण्यात आली. सूत्रसंचालन व नियोजन हेमा कोळेकर व नेहा घुले या सहशिक्षकांनी केले यांनी केले.