देहूरोड येथील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक,आरोपीला गुजरात मधून घेतले ताब्यात.

SHARE NOW

देहूरोड:

Advertisement

देहूरोड येथील थॉमस कॉलनी जंगल परिसरात दिलीप मोरिया (वय १६ वर्ष) या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे. ही खुनाची घटना गुरुवार दिनांक १२जुन २०२५ रोजी पहाटे उघडकीस आली होती. दुहेरी प्रेम प्रकरणातून या अल्पवयीन मुलाच्या खून करण्यात आला होता. या खुनातिल आरोपी सनी सिंग राजीव सिंग राजपूत(वय १९ राहणार शिवान बिहार राज्य) हा खून केल्यानंतर गुजरात मध्ये पळून गेला होता. आरोपीला गुन्हे शाखा पाच ने गुजरात मधील वडोदरा येथून अटक केली. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमाटणे फाटा येथील एका तरुणीचे दिलीप मोरीया याच्यासोबत प्रेम संबंध होते. त्याच तरुणीचे आरोपी सनी सिंग यांच्यासोबत देखील प्रेम संबंध होते. तीन महिन्यापूर्वी दिलीप आणि सनी या दोघांचे या प्रेम प्रकरणावरून भांडण झाले होते. बुधवार दिनांक ११जुन रोजी रात्री दिलीपने त्याचा चुलत भाऊ अरुणला फोन करून थॉमस कॉलनी जवळील जंगल परिसरात बोलून घेतले. तेथे सनी सिंन आणि दिलीप मोरीया यांचे भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी अरुण मध्ये पडला तेव्हा सनी सिग ने अरुण वर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अरुण जखमी झाला जखमी अवस्थेत तो थॉमस कॉलनी येथे आला अरुण यांनी मित्रांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर अरुणला देहूरोड कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र थॉमस कॉलनी जवळील जंगल परिसरात दिलीप याचा शोध लागला नाही. पोलिसांनी रात्रभर दिलीप चा शोध घेतला असता गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास दिलीपचा मृतदेह पुणे मुंबई महामार्ग लगत सर्विस रोडच्या खाली आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण द्वारे आरोपी चा माग काढला आरोपी वडोदरा येथे होता पोलिसांनी वडोदरा येथे जाऊन आरोपी सनी सिंग याला अटक केली. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.२४ तासाच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याने पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page