पुस्तके हवीत की मुलांना व्यसनाच्या आहारी जायला भाग पाडायचे अपक्ष बापूसाहेब भेगडे यांचे मत देण्याचे आवाहन

तळेगाव दाभाडे :

पुस्तके हवीत की आपल्या मुलांना व्यसनाच्या आहारी जायला भाग पाडायचे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, आधारयुक्त वातावरण असावे, अशा मताचा मी आहे. मावळवासियांचे आरोग्य चांगले असावे, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र, आमदार शेळके यांनी याच्या उलट कामे केली आहेत. अशा माणसाला पुन्हा निवडून देऊन मावळची संस्कृती बिघडवणार आहात का, असा सवाल मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष व जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी जनतेला केला.

बापूसाहेब भेगडे यांनी आपल्या गावभेट दौऱ्यात कातवी, वारंगवाडी, आंबी, नाणोली, नवलाख उंबरे, बधलवाडी, मिंडेवाडी, परिठेवाडी, जाधववाडी, जांबवडे, सुदवडी, सुदुंबरे, कुंडमळा, इंदोरी, कोटेश्वरवाडी, माळवाडी, वराळे या गावांना भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत निवडून देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळत करीत व विजय तिलक लावत उत्साहात स्वागत केले. यावेळी या सर्व गावांच्या ग्रामस्थानसह माजी सभापती निवृत्ती शेटे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, उद्योजक बाळासाहेब काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, सुनील दाभाडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी गावकऱ्यांनी बहुमताने बापूसाहेब भेगडे यांना निवडून द्यावे, असे वचन दिले. बापूसाहेब भेगडे यांनी अनेकांना घडवले आहे. मात्र, सध्या लोक चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देत आहेत. लोकांनी प्रामाणिक काम करावे, मावळातील प्रत्येक गावातला तरुण वर्ग कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, याची ग्वाही तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी दिली.

बापूसाहेब भेगडे म्हणाले, की समृद्धी, सन्मान, शांतता, संरक्षण हे आपले व्हिजन असून, मावळातील नागरिकांनी सुखी, शांत, समृद्ध तालुक्याचे जे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी माझ्यावर विश्वास टाका. तरुणांना वाममार्गाला लावणारा आमदार हवा की शिक्षण रोजगार देणारा आमदार हवा, याबाबत आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे. येणारी पिढी घडवण्यासाठी पुस्तकांची गरज आहे. महिलांविषयी कसं बोलावं, याचं भान नाही. पैशाच्या मस्तीमुळे आवाज वाढलाय का ?पैशाच्या जोरावर आलेली मस्ती जिरवायची आहे. मावळची संस्कृती, वारकरी संप्रदाय जपला जाईल, असे वाटले होते; पण सर्व व्यर्थ आहे, अशा शब्दात बापूसाहेब भेगडे यांनी आमदार शेळके यांच्यावर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page