मावळसाठी स्मार्ट व्हिजन असणारे बापूसाहेब भेगडेच आमदार हवेत ! खोटी आश्वासने देणारा नको, तर मावळला दिशा देणारा आमदार हवा अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचार
तळेगाव दाभाडे :
मावळचे आमदार आज मावळ तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात विकासाच्या नावाखाली तालुक्यातील नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे. एवढा मोठा निधी कुठे गेला, हा संशोधनाचा विषय आहे, असा सवाल मावळ तालुक्यातील ग्रामस्थ विचारत आहेत.
मावळ विधानसभा मतदार संघाचे सर्वपक्षीय व जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचारदौरा सुरू आहे. वेहरगाव येथे एकविरा देवी पायथा मंदिर येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन आजच्या दौऱ्याला सुरुवात झाली. वेहरगाव, दहिवली, कार्ला, शिलाटने, टाकवे खुर्द, मुंढावरे (फांगणे वसाहत), मुंढावरे, पाथर, ताजे, पिंपळोली, बोरज आदी ठिकाणी महिलांनी औक्षण करीत बापूसाहेब भेगडे यांचे स्वागत केले. तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या मावळ अध्यक्ष सायलीताई बोत्रे, भाजप नेते जितेंद्र बोत्रे, भाजपचे मावळ अध्यक्ष दत्तात्रेय गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद कुटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर आदींसह ग्रामस्थ आजी-माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
वेहरगाव येथील नागरिकांनी चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार यावेळी महिलांनी केली. ज्या पाण्यात म्हशी बसतात, ते पाणी आम्हाला पिण्यासाठी वापरावे लागते. फांगणे वसाहत येथील नागरिकांनी सांगितले, पाच वर्षांपूर्वी आमदारांनी पाण्याच्या टाकीचे काम सुरू केले. मात्र, अद्याप टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. बापूसाहेब भेगडे आमदार झाल्यावर या टाकीचे काम निश्चित पूर्ण करतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. महिलांबद्दल बोलताना शब्द जपून न वापरणाऱ्या आमदार शेळके यांचा जाहीर निषेध महिलांनी व्यक्त केला.
मावळमधील रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी व मावळचा स्मार्ट विकास करण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास नागरिकांनी यावेळी दिला.
प्रतिक्रिया :
गेल्या ५ वर्षात विकासकांना ब्रेक लावणाऱ्यांना, मावळची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्या, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये इंटरेस्ट दाखवून त्यांचे महत्त्व कमी करणाऱ्या, तसेच व्यापारी वर्ग व तरुणांना दिशाहीन करणाऱ्या, ट्रस्ट व गावांनाही विचारात न घेता कारभार हाकणाऱ्या आमदार शेळकेंना घरी बसवा.
– बापूसाहेब भेगडे, अपक्ष व जनतेचे उमेदवार, मावळ विधानसभा