बापूसाहेब भेगडे यांना वारकरी संप्रदायाचा पाठिंबा
तळेगाव दाभाडे :
मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष व जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मावळ तालुक्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे. मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने नुकतेच कान्हेफाटा येथील सेवाधाम येथे वारकरी बैठक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, ज्येष्ठ नेते सुकनशेठ बाफना, राजाराम महाराज शिंदे, गणेश महाराज गायकवाड, हभप माऊली महाराज ठाकर, हभप शिवाजीराव पवार, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे, सुरेशराव आडकर, अण्णासाहेब भेगडे, मावळ तालुका वारकरी संप्रदायचे अध्यक्ष नंदकुमार भसे, हभप सुभाष महाराज पडवळ, लक्ष्मण महाराज शितोळे पाटील, मकरंद ढम, बाबाजी महाराज काटकर, नंदू महाराज शेटे, हभप गबलू महाराज घारे, विठ्ठल महाराज पांडे, संजय महाराज कालेकर, नाथा महाराज शेलार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मावळ तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, मृदुंग, वादक, तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप सुनील महाराज वरघडे यांनी प्रास्ताविक, ह.भ.प. संतोष महाराज कुंभार यांनी सूत्रसंचालन, तर ह.भ.प. संतोष महाराज शेलार यांनी आभार मानले.