मोफत शालेय साहित्याचे वाटप..
कोंढवा पुणे
हौसाई सेमी इंग्लिश स्कुल येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथे विजया महाडिक मॅडम यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक 20 जून 2024 रोजी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या शुभहस्ते 70 विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी बोलताना जालींदर कामठे यांनी संस्थेस वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या विजया महाडिक मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपण मदत करत आहात म्हणूनच आम्हाला सामाजिक काम करणे शक्य होत आहे. शिक्षण यशाची गुरुकिल्ली आहे. विजया महाडिक मॅडम नेहमी आमच्या संस्थेच्या विद्यालयात, तसेच गोरगरीब होतकरू मुलांना शिक्षणाला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यानंतर त्यांचे सर्वांचे आनंदी चेहरे पाहून खूप आनंद झाला . सदर प्रसंगी मुख्याध्यापिका सारिका जगताप, विद्या घारे मॅडम जुवेरिया शेख मॅडम, चंद्रकला पवार मॅडम, प्रियंका चव्हाण मॅडम, माधुरी देसले मॅडम, सोनाली शिंदे, सारिका कोळी, अमोल ठाकरे, इब्राहिम शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी भोसले मॅडम यांनी केले तर आभार स्वाती शेवते मॅडम यांनी मानले.