वाळंज विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री रवींद्र सोनवणे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
पुणे :
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ पुणे आयोजित “जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार “सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा श्री. गणपत मोरे शिक्षण उपसंचालक पुणे, मा. श्री. डॉ. भाऊसाहेब कारेकर शिक्षण अधिकारी माध्यमिक पुणे यांच्या शुभं हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मा. नंदकुमार सागर सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, डॉ सागर देशपांडे शिक्षण तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पुणे शहर, व हवेली मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या वतीने केले.
मान्यवरांचा यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात आला. प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
मुळशी तालुक्यातील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथील जेष्ठ शिक्षक श्री रवींद्र मुरलीधर सोनवणे यांना “जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार “प्रदान करण्यात आला.
दुर्गम भागातील विद्यार्थी घडवले. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात सहभागासाठी उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल पुरस्कार दिला आहे. शिक्षणाविषयीं तळमळ आहे. असे मत संस्थापक अध्यक्ष मा. नंदकुमार वाळंज यांनी व्यक्त केल.
श्री सोनवणे यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल संस्थापक अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक मा नंदकुमार वाळंज, संस्था संचालिका सौ वत्सलाताई वाळंज, संस्था सचिव किसन गोरे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मा. नारायण दळवी, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मा. उल्हास मानकर, मुख्याध्यापक मा भटू देवरे, मुळशी तालुका मुख्याध्यापक संघ, मुळशी तालुका शिक्षक संघ यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल संस्था / शाळा सर्व सभासदांच्या व शाळेतील शिक्षक कर्मचारी,ग्रामस्थ आजी -माजी विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






