*तळेगाव येथे व्याख्यानमाला संपन्न*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे शेजार ज्येष्ठ नागरिक संघाच्या शेजार वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेच्या वतीने दोन दिवशीय व्याख्यानमाला स्टेशन भागात यशवंतनगर येथील शेजार वाचनालयाच्या प्रांगणात संपन्न झाली.शनिवारी(दि.३०)संत चोखामेळा व विठ्ठल भक्ती आणि रविवारी(दि.०१)संत गोरा कुंभार व विठ्ठल भक्ती या विषयांवर कक्षा पाटील यांचे व्याख्यान झाले.पाटील यांनी संत चोखा मेळा आणि संत गोरा कुंभार या दोन्ही संतांची श्री विठ्ठलांवर फार श्रध्दा होती,त्यांनी केलेले समाज प्रबोधनाची सविस्तर माहिती व्याख्यानात सांगितली. व्याख्यान मालेचे उदघाटन माजी नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे यांनी प्रास्ताविक केले.सुत्र संचालन ओंकार वर्तले यांनी केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगताप,मधुकर ठकार,सुधाकर देशमुख,नयना आभाळे उपस्थित होते.आभार सुधाकर देशमुख यांनी मानले.परिसरातील नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.