“विद्यार्थ्यांच्या गुणवर्धनासाठी पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – संतोष खांडगे”
तळेगाव दाभाडे:
शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवर्धनासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले.
येथील नवीन समर्थ विद्यालयात आयोजित संस्था व शिक्षक सहविचार सभेत ते बोलत होते. या प्रसंगी संचालक दामोदर शिंदे, महेशभाई शहा, सोनबा गोपाळे गुरुजी, मुख्याध्यापिका वासंती काळोखे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.
Advertisement
सभेत संतोष खांडगे यांनी शाळेच्या व शिक्षकांच्या अडचणी समजावून घेतल्या व त्यांच्या सोडवणुकीसाठी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका वासंती काळोखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अर्चना शेडगे यांनी मानले.






