*पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदखेड येथे सहावी व सातवी वर्गास मान्यता
चांदखेड :
पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदखेड येथे पाचवी सहावी व सातवीचे वर्ग सुरू करणे कामी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.श्री संजय तथा बाळा भेगडे मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य व मंडल अध्यक्ष पवन मावळ मा.श्री दत्तात्रय ज्ञानोबा माळी चांदखेड ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मा.सौ मीना दत्तात्रय माळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गजानन पाटील साहेब शिक्षण अधिकारी मा.नाईकडे साहेब मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री के के प्रधान साहेब गटशिक्षणाधिकारी मा.श्री वाळुंज साहेब, विस्ताराधिकारी मा. सौ. काळे मॅडम व केंद्रप्रमुख मा. सौ.क्षिरसागार मॅडम व चांदखेड ग्रामस्थांचा सहभाग लाभला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व शिक्षक वृंद यांच्या अथक मेहनती मेहनतीला सर्वांची साथ लाभली त्यामुळे पुणे जिल्हा प्राथमिक शाळा चांदखेड येथे पहिली ते चौथीपर्यंत असणारी शाळा सातवीपर्यंत सुरू झाली भविष्यात आठवी नववी दहावी सुरू होईल शिक्षकांच्या अथक प्रयत्नामुळे शाळेला पी. एम. श्री. दर्जा मिळालेला आहे.
तसेच शाळेच्या मूलभूत सुविधा बांधकाम इमारत या कामी ग्रामपंचायतीने भरीव मदत केली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद पुणे यांचे स्तरावरूनही भरघोस मदत करण्यात आली आहे.






