भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी –
तळेगाव दाभाडे:
भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे मत संतोष खांडगे यांनी व्यक्त केले
नुकतेच अॕड्.पु.वा. परांजपे विद्यामंदिर तळेगाव दाभाडे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दि.२० डिसेंबर व २१ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संतोष खांडगे होते बोलत होते तर प्रमुख वक्ते राजेंद्र घावटे हे उपस्थित होते
यावेळी संस्थेचे संचालक दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, चंद्रकांत शेटे ,महेश भाई शहा, सोनबा गोपाळे, शंकर नारखेडे, विनायक अभ्यंकर,अशोकराव काळोखे,हेड कमर्शियल महिंद्रा ऑटो स्टील चाकण प्रसाद पादिर , रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार , उद्योजक विलासशेठ काळोखे, मनोहर दाभाडे, काकासाहेब काळे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक प्रतिनिधी , १९७४-७५ बॅचचे माजी विद्यार्थी , पालक उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे ध्वजारोहण माजी विद्यार्थी उद्योजक विलासशेठ काळोखे यांच्या हस्ते झाले.चित्रकला व हस्तकला दालनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार, रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसाद पादिर, विज्ञान व गणित दालनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक शंकर नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले .
पुढे बोलताना संतोष खांडगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी भविष्यवेधी शिक्षण घेण्याचे तसेच, क्रांतिकारकांच्या कार्याचा वसा व वारसा जतन करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या *नंदादीप* या हस्तलिखिताचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या *विद्यार्थी रत्न* पुरस्काराचे वितरण ,इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या ईश्वरी झिंजुरके या विद्यार्थिनीचा विशेष सन्मान, बौद्धिक व क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी प्रसाद पादिर यांनी भविष्यात विद्यार्थ्यांना कंपनीच्या माध्यमातून शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तर मिलिंद शेलार यांनी कला ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले. बक्षिसपात्र गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले .
विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दि.२० डिसेंबर रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल, सत्यजित खांडगे,बसप्पा भंडारी,शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉ.प्रमोद बोराडे म्हणाले की,खेळातुन विद्यार्थ्यांची संघ भावना विकसित होऊन निर्णय क्षमता वाढते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे व सुवर्णा काळडोके यांनी तर तर आभार पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे व पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन प्रमुख आशा आवटे ,संपत गोडे , शिक्षकेतर प्रमुख दत्ता ठाकर, मंगेश कदम, शिक्षक प्रतिनिधी अनिता नागपुरे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.