*शिवसेनेच्यावतीने 100 शालेय मुलांना मोफत स्वेटर आणि पोषण आहार वाटप*
पवनानगर –
काले जि प शाळा व अंगणवाडी च्या मुलांना अमित कुंभार मित्र परिवार व शिवसेना च्या वतीने आज दिनांक 20/12/2024 रोजी मोफत स्वेटर आणि पोषण आहार किट कार्यक्रम घेण्यात आला शांताई मंगल कार्यलयात हा कार्यक्रम घेण्यात आला मुलांना थन्डी पासून संरक्षण मिळावे आणि त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्हावी या उद्धेशाने हा कार्यक्रम घेण्यात आला तसेंच पाल्य -पालक -शिक्षक यांचे संबधं कसे असावेत यावर श्री शांताराम भोते यांचे व्याख्यान झाले छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपती अब्दुल कलाम, तसेंच चालू घडमोडी चे दाखले देत त्यांनी सुंदर असे व्याख्यान केले
या कार्यक्रमचे आयोजन अमित कुंभार यांनी केले होते तसेंच प्रमुख पाहुणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, रिपाई चे तालुका अध्यक्ष नारायण भालेराव, काँग्रेस आय चे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी उपाध्यक्ष चंद्रकांत दहिभाते, शिवसेना उप तालुका प्रमुख युवराज सुतार, भाजपा उपाध्यक्ष संदीप भूतडा,विभाग प्रमुख भरत भोते, समन्वयक अनिल भालेराव, वाघू दळवी,शाखाप्रमुख शंकर दळवी,शाखाप्रमुख तानाजी लायगुडे समीर वाळुंज, संदीप झांबरे, संतोष पवार, गीता सोनावले, अतुल केंडे, सनी जव्हेरी, अल्ताप शेख, संतोष कालेकर, पोपट भालेराव, उमेश कुंभार, जयदीप कुंभार उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विलास मोरे,किरण सचिन लाहुडकर, नागनाथ व्यंकटराव चामे रुपनर सर संतोष कोळी तसेंच अंगणवाडी सेविका यांनी विशेष प्रयत्न केले.
सूत्रसंचालन विलास मोरे सरांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित कुंभार यांनी केले तर आभार सौं किरण लहुडकर यांनी केले