संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
देहू :
बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. आत्महत्येचे कोणतेच ठोस कारण अद्याप समोर आले नाही. येत्या 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता. त्यापूर्वीच महाराजांनी हे पाऊल उचलल्याने देहू वासियांना यांना मोठा धक्का बसला आहे.
शिरीष महाराज यांनी अलीकडेच नवीन घर बांधले होते. त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर आई वडील राहत होते तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या खोली झोपण्यासाठी गेले. मात्र सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. घरच्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जबरदस्तीने दार तोडून पाहिले असता, त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिरीष महाराज यांनी आत्महत्या पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी या पत्राचा तपशील गोळा केला असून, प्राथमिक तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आधी तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे करत आहेत.