*तळेगावातील दानशूर व्यक्तिमत्व हरपले…रमाकांत नायडू यांचे दुख:द निधन……..*
तळेगाव दाभाडे :तळेगावातील विविध संस्थांना आणि गरजू व्यक्तींना अडचणींच्या वेळी मदत करून प्रसिद्धी पासून कायम दूर असलेले दानशूर व्यक्तिमत्व रमाकांत वासुदेव नायडू यांचे दीर्घ आजाराने आज संध्याकाळी दुख:द निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी इंद्रायणी, दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
रमाकांत नायडू यांनी करोनाच्या संकटात अनेक कुटुंबियांना अन्न धान्न्याची मदत केली होती.
विविध शाळांमधील गरजू मुलांना गणवेश वाटप,पुस्तके,वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले होते.
तळेगावातील वन्यजीव रक्षक व आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या टीम ला आवश्यक साहित्य व लाईफ बोटीचे इंजिन देणगी म्हणून दिले होते.
ईर्षाळवाडी दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाला मोठ्या रकमेची मदत केली होती.
अनेक रुग्णांना त्यांनी अर्थ सहाय्य केले. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले. ते जागरूक वाचक कट्ट्याचे सदस्य होते
त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना.
उद्या सकाळी १० वा. त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी सान्वी सोसायटी (अथर्व हॉस्पिटल जवळ ) येथ अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल व सकाळी ११:३० वा.बनेश्वर येथे अंत्य संस्कार होतील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शांती देवो.