आयुष्यात ध्येय असणं गरजेचे व ते प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्या – मा. श्री. मिलिंद दादा वाळंज

मुळशी :

सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे या विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन पर मनोगतात मा. मिलिंद दादा वाळंज म्हणाले की, विद्यार्थी मित्र हो आपल्या आयुष्यात ध्येय असणं खूप गरजेचे आणि ते प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्या. म्हणजे तुम्ही नक्की यश मिळवणार. मिलिंद वाळंज यांनी सर्व परीक्षार्थिना शुभेच्छा दिल्या. व भविष्यात आवश्यक त्या ठिकाणी मदत मागा मी तयार राहील.असे आश्वासन दिले.

या प्रसंगी जेष्ठ ग्रामस्थ यशवंत माताळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नारायण दळवी, आंबवणे ग्रुप ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच निलेश मेंगडे, ग्रामपंचायत सदस्या मेघाताई नेवासाकर, अक्षराताई दळवी,

पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष योगेशभाऊ वाळंज, मनोज जंगम,प्रविण माताळे,मंदाताई वाळंज, विद्यालयाचे मुख्याध्यापक भटू देवरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

Advertisement

मान्यरांनी सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरवात केली.विद्यार्थिनींनी स्वागत

गीतातून स्वागत केले.मान्यवर व सर्व शिक्षक यांचा सन्मान विदयार्थ्यांनी केला.

10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक व कर्मचारी यांची फोटो प्रतिमा व दोन गॅस शेगडी शाळेला भेट दिली. रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला.सुरेश दादा कालेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना कंपास भेट दिली. सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.संजय कुलथे, बाळासाहेब खेडकर,राहुल आवळे,विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी , महादेव खेडकर, मंदा दळवी, अरुणा दळवी यांनी मेहनत घेतली.विद्यार्थी प्रणव मोढवे याने प्रास्ताविक केले. आणि साईराज राऊत याने सूत्रसंचालन केले. कभी ख़ुशी कभी गम अश्या भावनिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची  सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page