वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी वैष्णव काकडे ला भारतात दुहेरी डॉक्टरेट. जगातील सर्वात तरुण भौतिक शास्त्रज्ञ म्हणून विक्रम प्रस्थापित
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंबातील डाॅ वैष्णव शैलेश काकडे यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भौतिकशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवून जगातील सर्वात तरुण भौतिक शास्त्रज्ञ म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच त्यांनी भारतातील सर्वात तरुण दुहेरी डॉक्टरेट होण्याचा मानही पटकाविला आहे.व्कांटम रिलेटिव्हिटी या अत्यंत अवघड विषयावर वैष्णव यांनी जागतिक पातळीवर संशोधन करत भारताला आघाडीच्या स्थानकावर पोहोचविण्याचे मौलाचे कार्य केले असून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना सर्वात तरुण व्हिजनरी म्हणून ओळख मिळाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारत गौरव रत्न( अर्ध- शासकीय संस्था) आणि बिड्डा बिझनेस एक्सलन्स अवाॅर्ड यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले आहे. वैष्णव यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या बाळावर हे उज्वल यश संपादन केले आहे. दुहेरी डॉक्टरेट मिळाल्याने वैष्णव यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित केले.






