मावळ इंडस्ट्री मिट २०२५ हा तालुक्याच्या औद्योगिक भविष्यासाठी ऐतिहासिक टप्पा ठरेल,माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे
तळेगाव दाभाडे :

माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या पुढाकाराने मावळ इंडस्ट्री मिट २०२५ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लघु. मध्यम आणि मोठे उद्योग यांचे प्रतिनिधी उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते. यावेळी उद्योगासमोरील सध्याच्या आव्हानावर चर्चा होऊन त्यावरील उपाय योजना मांडण्यात आल्या. तसेच भविष्यातील औद्योगिक धोरणे व विकासाच्या दिशांचा आढावा घेण्यात आला या मिटमध्ये पायाभूत सुविधा. वाहतूक व्यवस्था. गुंतवणूक संधी. स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती. उद्योग शेती समन्वय. उत्पादनक्षमता आणि शाश्वत विकासासाठी हरित धोरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार विनिमय करण्यात आला. सरकार आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहयोग अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. उद्योग प्रमुखांनी मावळच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्याची ग्वाही यावेळी दिली. माजी राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यावेळी बोलताना म्हणाले की मावळ इंडस्ट्री मिट २०२५ हा तालुक्याच्या औद्योगिक भविष्यासाठी ऐतिहासिक टप्पा ठरेल. मिट मुळे औद्योगिक क्षेत्रातील संवाद आणि नेटवर्किंग ला नवे व्यासपीठ मिळेल असा विश्वास बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






