श्रीक्षेत्र घोरावडेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह २०२६ नियोजन बैठक संपन्न
घोरावडेश्वर : श्रीक्षेत्र घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह २०२६ व महाशिवरात्री यात्रा सोहळा यांच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत दि. ९ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा, गाथा पारायण, हरिपाठ तसेच पंचक्रोशीतील महिला भजनी मंडळांची सेवा होणार आहे.
यावेळी अखंड हरिनाम सप्ताह २०२६ व महाशिवरात्री यात्रा सोहळा समितीच्या अध्यक्षपदी श्री. तुषार दत्तात्रय तरस यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. पोपटराव भेगडे व श्री. भानुदास गोपाळे, सचिवपदी श्री. नरहरी बोडके, खजिनदारपदी श्री. राजेश मुर्ह, सहसचिवपदी श्री. दीपक दांगट तर सहखजिनदारपदी श्री. नारायण मराठे यांची निवड करण्यात आली.
बैठकीस ज्येष्ठ विश्वस्त मुकुंद नाना राऊत, भाऊसाहेब पानमंद, किसनराव भेगडे, सतीश शेठ अग्रवाल, विठ्ठलराव भेगडे, पोपटराव भेगडे, मधुकर बोडके, विजय भोंडवे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर शेलार, शिवाजी सावंत, तानाजी वाघोले, आनंद गोपाळे, कार्याध्यक्ष आनंद भाऊ भेगडे, उपाध्यक्ष अभिजीत भेगडे, उदय भेगडे, सचिव योगेश शेलार आदी मान्यवर उपस्थित
होते.






