ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रुडसेट संस्था) येथे नवीन संचालक रुजू.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रुडसेट संस्था) येथे नवीन संचालक म्हणून कॅनरा बँकेचे वरिष्ठ प्रबंधक श्री राजकुमार बिरादार यांनी पदभार स्वीकारला आहे.
श्री राजकुमार बिरादार हे तत्कालीन सिंडीकेट बँक बँकेत कृषी अधिकारी म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली होती.
कृषी अधिकारी म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांच्या ग्रामीण भागांमध्ये कामकाज केलेले आहे. त्यांची ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ व असलेले अनुभव काम याचा रूडसेट संस्थेस फायदा होणार आहे.
यावेळी त्यांचे स्वागत संस्थेत उपस्थित असलेले कर्मचारी व चालू असलेल्या ब्युटी पार्लर बॅचच्यावतीने करण्यात आले.