*जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जल्लोषात संपन्न*
तळेगाव दाभाडे :
शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा मागील पंधरा वर्षापासून जतन करणारे विद्यार्थी म्हणजेच शाळेचे भूषण आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्टा करून मिळालेले उत्तुंग यश ही त्यांच्या कार्याची पावती आहे विशेष आनंदाची बाब म्हणजे एकूण 96 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 90 टक्क्यापुढील 23 विद्यार्थी तसेच 80ते 90 टक्केवारी मध्ये एकूण 44 विद्यार्थी आणि इतर सर्व मुले पहिल्या श्रेणीत यशस्वी झाले आहेत म्हणूनच आज त्यांचा सत्कार त्यांच्या पालकांच्या समवेत आनंदी उत्साही वातावरणात करण्यात आला.
शाळेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना शालेय जीवनानंतरच्या प्रवासात शैक्षणिक मार्गदर्शनासाठी शाळेत तुमचे नेहमीच स्वागत असेल आपली शाळा म्हणून तुम्ही केव्हाही हक्काने जैन इंग्लिश स्कूल मध्ये येण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या* *यशाचे भरभरून कौतुक केले.
शाळेचे संचालक सदस्य दिलीप पारेख आणि किरण परळीकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले असताना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले तसेच कोणत्याही
*मुख्याध्यापिका सौ विजया शिंदे आणि शुभांगी भोईर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच*
*पालक प्रतिनिधी श्री पंढरीनाथ घुले यांनी तर विद्यार्थ्यांमध्ये प्राप्ती हडवळे आणि अंजली भोर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.* शिक्षकांच्या वतीने सौ आरती पेंडभाजे यांनी आपल्या कवितेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता फाकटकर यांनी केले.