अ.भा.मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे आयोजित बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम!…….

SHARE NOW

तळेगाव दाभाडे-

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे मावळ आयोजित कै.पै.मोहन महादेव काकडे स्मरणार्थ, कै.थोर साहित्यिक गो.नी. दांडेकर करंडक आंतरशालेय बालनाट्य एकांकिका स्पर्धा नुकत्याच तळेगाव येथील श्रीरंग कलानिकेतनच्या रंगमंचावर संपन्न झाल्या. मावळ तालुक्यातून प्राथमिक गटात ११ शाळा व माध्यमिक गटात ९ शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धेचा भव्य दिव्य स्वरूपाचा पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध विनोदी मराठी अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. प्राथमिक गटातून जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे यांच्या “लांबच लांब शेपूट” या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला तर माध्यमिक विभागात आदर्श विद्यामंदिर या प्रशालेच्या “घे भरारी” या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्या अंगी असलेले कलागुण व छंद जोपासून खूप कष्ट करून मोठे व्हावे असे प्रतिपादन विनोदी अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या उपक्रमांचे कौतुक केले तर नाट्य परिषदेच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम राबवणार असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविकाद्वारे प्रतिपादन केले व नाट्य परिषदेच्या विविधांगी उपक्रमांची माहिती दिली समाज उपयोगी उपक्रमास व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश काकडे यांनी केले.

या बालनाट्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा साप्ताहिक अंबरचे मुख्य संपादक पंडित सुरेश साखवळकर यांच्या हस्ते संपन्न झाला .सुरेश साखवळकर, विलास काळोखे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

बालनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ थाटामाटात संपन्न झाला. असून विद्यार्थी व शिक्षकांचा उदंड प्रतिसाद या उपक्रमाला लाभला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख भगवान शिंदे यांनी केले, आभार प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे यांनी मानले

Advertisement

प्राथमिक विभागाच्या निकालाचे वाचन प्रा.अशोक जाधव यांनी तर माध्यमिक विभागाच्या निकालाचे वाचन स्पर्धा प्रमुख नयना डोळस यांनी केले. कार्यक्रमासाठी नाट्य परिषदेचे विलास काळोखे, नितीन शहा, विश्वास देशपांडे, संजय वाडेकर,बाळासाहेब गायकवाड इत्यादी मान्यवर रंगमंचावर उपस्थित होते.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन शहा, नयना डोळस, भगवान शिंदे,अशोक जाधव, मंजुश्री बारणे, दिपाली पाटील, मीनल रणदिवे, युगंधरा बढे, ज्योती राठोड, सुनील करंजे,तानाजी मराठे,डॉ.मिलिंद निकम यांनी अथक परिश्रम घेतले. चेतन प्रकाश पंडित,विराज शरद सवाई, मधुवंती नरेंद्र हसबनीस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.ध्वनी व्यवस्था सुमेर नंदेश्वर यांची होती तर छायाचित्रण अंकुश दाभाडे व मंडप व्यवस्था सलीम काझी यांची होती.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

प्राथमिक शाळा गट

प्रथम क्रमांक-जैन इंग्लिश स्कूल (नाटक-लांबच लांब शेपूट)

द्वितीय क्रमांक-पैसाफंड प्राथमिक शाळा ब (यात चूक कुणाची)

तृतीय क्रमांक-आदर्श प्राथमिक विद्या मंदिर (जादूचा शंख)

उत्तेजनार्थ-पैसाफंड प्राथमिक शाळा अ (अहो आमचं ऐका)

माध्यमिक विभाग निकाल खालील प्रमाणे

प्रथम क्रमांक-आदर्श विद्या मंदिर (नाटक-घे भरारी)

द्वितीय क्रमांक-जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे (चिऊ काऊ)

तृतीय क्रमांक-सह्याद्री इंग्लिश स्कूल (सिंहगडाला जेव्हा जाग येते)

उत्तेजनार्थ-स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल (नव्या युगातील झाडाची नवी कहाणी)

नाट्यलेखनाचे प्रथम, द्वितीय क्रमांक अनघा कुलकर्णी, विजयमाला गायकवाड, मेघना विरकर,ज्योती कोरे, यांना मिळाले तर नाट्यदिग्दर्शन बक्षिसे सुमेध सोनवणे, श्रद्धा आल्हाट, कौस्तुभ ओक, प्रतीक्षा ढवळे,सुजाता डावखरे,यांना मिळाली.अनिशा गायकवाड, श्रेयश महाले,श्रुतिका लांडे, श्रीहरी टिळेकर,ओंकार राठोड, आदिती गुडमे,अन्वेष हिंगे,सिद्धी देशपांडे,समर्थ कालेकर,प्रियदर्शनी कैरवाडगी या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक अभिनयाची बक्षिसे पटकावली.

भव्य फिरता करंडक सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र रोख रक्कम देऊन नाट्य परिषदेने शाळांना भव्य दिव्य समारंभात गौरविले आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या स्तूत्य उपक्रमाचे मावळ तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page