तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागातील संतोष शिंदे यांची शोधनिबंध स्पर्धेत राज्यस्तरीय निवड
तळेगाव दाभाडे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर (सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित…
विभाग स्तरीय (पुणे, अहिल्यानगर व सोलापूर) येथे मागील आठवड्यात शिक्षक व अधिकारी स्पर्धेतील SVSC कॉलेज सोलापूर येथे पार पडलेल्या ‘शोधनिबंध’ (Research Paper) स्पर्धेमध्ये “अभासी शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययन सवयींमध्ये झालेला बदल” या विषयावरील शोधनिबंधात…
तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागातील पीएमश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 6 चे उपक्रमशील व आदर्श शिक्षक श्री. संतोष अर्जुन शिंदे सर यांनी विभाग स्तरावर ‘द्वितीय क्रमांक’ पटकावल्या बद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..त्यांच्या निवडीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण विभागाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.यासाठी मार्गदर्शक व प्रेरणास्थान प्रशासनाधिकारी श्रीमती. अनिता वैद्य मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय चांदे सर, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
जानेवारीत वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन…पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…






