भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी प्रशांतदादा भागवत यांच्या वतीने बसची व्यवस्था; इंदोरी–वराळे गटातील बांधवांनी व्यक्त केले आभार
मावळ
शौर्याची गाथा आणि विजयाची परंपरा जपणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी इंदोरी–वराळे गटातील नागरिकांसाठी श्री. प्रशांतदादा भागवत युवामंच यांच्या वतीने विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे इंदोरी–वराळे गटातील बंधू व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत शौर्यदिनाचा ऐतिहासिक सोहळा अनुभवला.
या वेळी उपस्थित बंधू-भगिनींसोबत मा. श्री. प्रशांतदादा भागवत व सौ. मेघाताई भागवत यांनी संवाद साधला. शौर्यदिनाचे ऐतिहासिक महत्त्व, सामाजिक एकोपा आणि भावी विकासाच्या दिशेने एकत्रित वाटचाल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला विश्वास व्यक्त केला.
मेघाताई भागवत या जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटातून इच्छुक उमेदवार असून त्यांना खेडोपाड्यांपासून गाववस्त्यांपर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून, त्यांच्या कार्यपद्धतीला समाजातील विविध स्तरांतून दाद मिळत आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा हा त्यांच्या नेतृत्वासाठी आशेचा किरण ठरत आहे.
सर्व समाजघटकांना समाविष्ट करून घेण्याच्या संकल्पनेतून मेघाताई भागवत यांनी आदिवासी बांधवांसाठी शौचालय उभारणीसारखी ठोस कामे केली आहेत. महिला, आदिवासी बांधव व सर्वच समाजातील घटकांसाठी निस्वार्थीपणे काम करत त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे व लोकांशी असलेल्या थेट संवादामुळे समाजात त्यांची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट होत असून, इंदोरी–वराळे गटाच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.






