चला घडवूया नवा भारत संकल्पनेवर सरस्वती विद्यामंदिर मध्ये उत्साहात स्नेहसंमेलन साजरे

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

 

सरस्वती शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता बालवाडी ,माध्यमिक व दुपारी तीन वाजता प्राथमिक असे दोन टप्प्यात स्नेहसंमेलन झाले .सकाळच्या विभागात अध्यक्ष स्थानी माननीय श्री संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) साहेब (नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगरपरिषद) यांनी भूषवले व माननीय श्री.महेंद्र पळसे माजी सभापती शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते. दुपारच्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्रीमती अनिता वैद्य (प्रशासन अधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद. )माननीय श्री पंकज गुप्ता (डेप्युटी कमांडंट सीआरपीएफ), माननीय श्री रामदास यशवंते (इन्स्पेक्टर जी डी सी आर पी एफ) हे उपस्थित होते

 

 

Advertisement

दोन्ही कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व संस्थेचे सर्व मान्यवर अधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, ईशस्तवन, नृत्यातून स्वागत गीत या कार्यक्रमातून झाली. अहवाल वाचन बालवाडी विभाग सौ सोनाली काशीद बाई, प्राथमिक विभागाचे वाचन मुख्याध्यापक माननीय श्री नवनाथ गाढवे सर तर माध्यमिक विभागाचे वाचन मुख्याध्यापिका माननीय सौ.रेखा परदेशी यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागात शिक्षण मंडळ समिती सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर तर प्राथमिक विभागात संस्थेचे अंमलबजावणी अधिकारी माननीय श्री अनंतराव भोपळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख सकाळच्या सत्रात माननीय मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी बाई यांनी करून दिली तर दुपारच्या सत्रात माननीय श्री नवनाथ गाढवे सर यांनी करून दिली. प्रमुख अतिथी माननीय श्री संतोष दाभाडे साहेब यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश झेंड यांनी केला. तर दुपारच्या सत्रात माननीय श्रीमती गुप्ता यांचा सत्कार सरस्वती शिक्षण संस्थेच्या खजिनदार माननीय सौ सुचित्राताई चौधरी यांनी केला. दोन्ही सत्रात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . याच कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना गौरवण्यात आले. याचे वाचन माध्यमिक भागातून श्री संजय गायकवाड सर तर प्राथमिक विभागातून सौ. शोभा जाधव यांनी केले. अतिथी मनोगत मध्ये माननीय श्री संतोष दाभाडे साहेब म्हणाले आजही विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा समन्वय सरस्वती विद्यामंदिर या शाळेत साधला जातो . या शाळेमध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडतात. तर दुपारच्या सत्रातील माननीय प्रमुख अतिथी श्रीमती अनिता वैद्य म्हणाल्या की शाळेच व्यवस्थापन उत्तम आहे . रेकॉर्ड हे अगदी व्यवस्थित आहे. माननीय श्री गुप्ता म्हणाले की, आजची स्नेहसंमेलनाची थीम आहे *चला घडवूया नवभारत* ही थीमच मला खूप आवडलेली आहे. तर माननीय श्री यशवंते साहेब यांनी आलेल्या कठीण परिस्थितीवर कशी मात करावी याबद्दल सांगितले. याचवेळी माननीय श्री प्रदीप टेकवडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. सकाळच्या सत्रातील आभार माध्यमिकच्या पर्यवेक्षिका सौ सुरेखा रासकर यांनी मानले. तर दुपारच्या सत्रात सौ ठाकूर बाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमात पत्रकार माननीय श्री जगन्नाथ काळे, व सौ रेखा भेगडे हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश झेंड सर उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप कुलकर्णी सर, खजिनदार माननीय सौ सुचित्राताई चौधरी, कार्यवाह माननीय श्री प्रमोद देशक सर, अंमलबजावणी अधिकारी माननीय श्री अनंतराव भोपळे सर, कार्यकारिणी सदस्य माननीय श्री विश्वास देशपांडे सर, शिक्षण समिती सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर ,संस्थेचे सदस्य माननीय श्री सुनील आगळे सर , माननीय श्री श्रीकांत इनामदार सर,मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी बाई ,मुख्याध्यापक श्री नवनाथ गाढवे सर ,बालवाडी विभाग प्रमुख सोनाली काशीद बाई , इंदोरीच्या बालवाडी विभाग प्रमुख सौ अर्चना एरंडे बाई प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री नितीन शिंदे सर हे सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माध्यमिक विभागाचे सूत्रसंचालन सौ सुनीता कुलकर्णी बाई तसेच प्राथमिक विभागाचे सूत्रसंचालन सौ तृप्ती भास्कर यांनी केले .नंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला .सकाळच्या विभागातून विविध गुणदर्शनाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील श्रेया योगेशचंद्र देवळालकर या विद्यार्थिनीने अतिशय उत्तम रीतीने केले. तर दुपारच्या विभागातील सूत्रसंचलन सोनल शेटे व सौ वनिता गायकवाड यांनी केले .संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संस्थाचालकांचे मार्गदर्शन, मुख्याध्यापक मार्गदर्शन सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन ,विद्यार्थ्यांचे प्रयत्न व शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांनी कामाचे दिलेले योगदान यामुळेच हे स्नेहसंमेलन अतिशय आनंदात व उत्साहात पार पडले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page