*परांजपे विद्या मंदिर’चा १०वी निकाल १०० टक्के*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु.वा. परांजपे विद्या मंदिर शाळेचा यंदाचा इ. १० वी चा निकाल १०० टक्के लागला आहे.
यामध्ये प्रथम क्र- प्रतिक्षा खोत ९२.६० टक्के,द्वितीय क्र. दक्ष कांबळे ९२.४०टक्के तृतीय क्र- प्रिती तोडकरी ९१.२० टक्के
या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के तसेच सर्व संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे, यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.