*इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिरचा निकाल शंभर टक्के*
इंदोरी :
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संस्थेचे इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिरचा दहावीचा निकाल १००टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. प्रथम क्र.-राजश्री शेजाळ ९४टक्के,द्वितीय क्र.-राहुल गवळी-९३.६०टक्के,सिध्दी क-हे९३.६०टक्के, तृतीय क्र.-सार्थक राक्षे-९०.६०टक्के.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश मस्के,शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे मुख्याध्यापक रेवाप्पा शितोळे,पर्यवेक्षक कमल ढमढेरे,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.