आळंदी इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा परंपरेने उत्साहात साजरी हजारो भाविकांची आळंदीत गर्दी ; वरुणराजाचीही हजेरी ; फटाक्यांची आतिषबाजी
आळंदी :
आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर महाराष्ट्रात स्थायिक तसेच उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा हजारो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करून व्रत जोपासले. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी, पूजा पाठ, व्रत परंपरा जोपासत महाछठ पर्व साजरे केले. या वेळी वारुणराजानेही हजेरी लावली. यातही उत्तर भारतीय नागरिकांनी उत्साह कमी होऊ न देता छठ पूजा परंपरेने उत्साहात साजरी केली. यावेळी नारी रत्न डॉ. सुनीता पाटेसकर यांचे कार्याचा सन्मान करीत त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, माजी विरोधी पक्ष नेते डी.डी.भोसले पाटील, आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी श्री राम ट्रस्ट विश्वस्त मंदिर अर्जुन मेदनकर, मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक सुधीर मुंगसे, माजी सरपंच अमोल वीरकर, दिलीप मुंगसे, गोपालकृष्ण मंदिर विश्वस्त उमेश बिडकर, उद्योजक सुरेश दौडकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, विनोदकुमार मिश्रा, राकेश महातो, श्रीनिवास मिश्रा, राजेंद्र हरिश्चंद्र, राजेश यादव, जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक डॉ. अन्नू भारद्वाज, सुधीरकुमार शर्मा, कृष्णा भारद्वाज, राकेशकुमार महतो, विनोदकुमार मिश्रा, अरविंद सिंग यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इंद्रायणीची आरती व पूजा, दीप प्रज्ज्वलन, दीपोत्सव, दीप दान, व्रत जोपासात इंद्रायणीत उतरून महापर्व सेवा साधना, धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, सुधीरकुमार शर्मा, कृष्ण एस.भारद्वाज, राकेशकुमार महतो, विनोदकुमार मिश्रा, जितेंद्र सिंग, धर्मेंद्र सिंग, अरविंद सिंग आदींनी यासाठी परिश्रम पूर्वक यशस्वी नियोजन केले. उपस्थित मान्यवर यांचा सन्मान यावेळी उत्साहात करण्यात आला.
यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनास श्री सत्य साई सेवा संगठन, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सत्य साई सेवा संगठन कैप्टन गिरीश लेले, श्रीमती शालिनी माखीजा ताई, सतीश कोटा यांचे सहकार्य लाभले.
छठ पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रद्धेने ३ दिवस अनेकांनी निर्जल उपवासासह केली. या पूजेत मावळत्या सूर्य देवाला व सकाळी उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य ( नमन ) करून करण्यात आली. यावेळी छठ वृत्तीचे स्वागत, दीप प्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्या अर्घ्य, कार्तिकी अन्नदान, प्रात: अर्घ्य, महाप्रसाद, पाणी वाटप सेवा रुजू करण्यात आली. या पूजेतून सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना आहे. या छठ पूजा महापर्वाचे आयोजन जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीरकुमार शर्मा, संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्णा एस.भारद्वाज, विनोदकुमार मिश्रा, राकेशकुमार महतो यांनी केले. यावेळी आळंदी व दिघी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी कामकाज पाहिले. इंद्रायणी नदीघाटावर यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. छठ पूजा महापर्वाचे जगतगुरू शंकराचार्य समितीचे वतीने उत्साहात आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सुधीरकुमार शर्मा यांनी सांगितले. तसेच विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर ‘भव्य काशी गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले होते. भक्ती भावपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी काशी येथून आलेल्या पौरोहित्यांनी विधिवत आरती केली. राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमासह विश्व श्रीराम सेना ही संस्था छठ महापुजा निमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करीत असते. या महोत्सवाची सांगता पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन होते. सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. अशी माहिती संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्णा एस.भारद्वाज, सुधीरकुमार शर्मा यांनी दिली. यावेळी छटपूजा संयोजन जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीरकुमार शर्मा, संयोजक डॉ. अन्नू भारद्वाज, कृष्णा भारद्वाज, विनोद मिश्रा, राकेशकुमार महतो, राजेश यादव यांनी परिश्रम पूर्वक यशस्वी नियोजन केले.






