*जान्हवी दांडगे मावळ तालुक्यात प्रथम*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन या शाळेची जान्हवी दांडगे हि विद्यार्थीनी दहावीच्या परीक्षेमध्ये ९९टक्के गुण मिळवून मराठी माध्यमाच्या शाळेत मावळ तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.रामभाऊ परुळेकर विद्यालयात प्रथम तीन आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.प्रथम क्र.-जान्हवी दांडगे ९९टक्के.द्वितीय क्र.-ऋतुजा उंडे ९५.८०टक्के तृतीय क्र.-रोहन टाके९३.६०टक्के.
यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे विश्वस्त नंदन रेगे,शाळेचे मुख्याध्यापक दीपक फोंडके,पर्यवेक्षक दत्तात्रय जोशी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.