नीलया सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीची निवडणूक बिनविरोध. नाथा मोहिते अध्यक्ष, फातिमा शेख सचिव तर विपुल ननवरे खजिनदार पदी एकमताने बिनविरोध निवड…
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील नीलया सहकारी गृहनिर्माण संस्थाची वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदासाठीची २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यामध्ये अध्यक्ष श्री. नाथा मोहिते, सचिव, सौ. फातिमा शेख आणि खजिनदार श्री. विपुल ननवरे यांची एकमेकांच्या सहकार्याने बिनविरोध निवड झाली. तळेगाव दाभाडे येथील नाईकनवरे डेव्हलपर्सचा पहिला महारेरा प्रोजेक्ट म्हणून गौरव झालेल्या या सोसायटीमध्ये ए, बी आणि सी अशा एकूण तीन विंग असून या सोसायटीमध्ये जवळपास साडेचारशे पेक्षा जास्त रहिवाशी वास्तव्यास आहेत. या साडेचारशे रहिवाशांनी संदीप कांबळे, सुधाकर मोरे, मयुरी लोंढे, आशा बोरकर, विपुल ननवरे , राम लोहार, अजय देशमुख, वृषाली गद्रे, आशालता महाजन, गणेश शिर्के, पराग कांबळे, गौरव कासार, फातिमा शेख, ज्योती बनकर, बाळाराम शिंदे, दश्मी इंजे आणि नाथा मोहिते या १७ सदस्यांची बिनविरोध निवड केली होती. या सतरा सदस्यांनी सर्वानुमती मिळून वरील तीन जणांची एकमताने बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम जरे यांनी काम पाहिले.
नीलया सोसायटी नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवत आली आहे. सर्व धार्मिक सण उत्सव, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या जयंती, उत्सव तसेच लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करत नीलया सोसायटीची वाटचाल सुरू आहे. सोसायटीतल्या सर्व रहिवाशांनी सर्व सदस्यांचे तसेच अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
खरंच एवढ्या मोठ्या सोसायटी मधील रहिवाशांनी सदस्य, अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांना बिनविरोध निवडून देणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. फार थोड्या सोसायट्यांमध्ये असा एकोपा पाहायला मिळतो. अशी बिनविरोध निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे होत असल्याची भावना निवडणूक निर्णय अधिकारी एम.जरे यांनी व्यक्त केली