सुखसागर जैन स्थानकांत तप महोत्सव तपस्वीच्या भव्य वरघोडयाचे आयोजन : तपस्वीचा सन्मान

कोंढवा पुणे

पुणे :प. पु सौरभमुनीजी व प. पु. गौरवमुनीजी म. सा. आदि ठाणा,प.पू.पुण्यशीलाजी म.सा.आदी ठाणा यांच्या सानिध्यात सुखसागर श्रावक संघाच्या वतीने सर्व तपस्वीचा भव्य वरघोडा काढून स्वागत सन्मान करण्यात आला.

कोंढवा येथील प्रसिध्द उद्योगपती, समाजसेवक चोरडिया बंधु यांच्या निवास स्थानापासून या तपस्वींच्या वरघोडयाचे आयोजन करण्यात आले होते. या चातुर्मास मध्ये व संवसरी काळामध्ये 2 मासखमण, 5 पंधरा उपवास, 4 आकरा उपवास, १२ नऊ उपवास, 82 आठ उपवास,15 पाच उपवास, ४६५ तेले, 500 बेले, हजारो 1 उपवास, ८५० आयबील, ३१३ पद्ममावती एकासना, ७० एकसाना मासखमण,२५० द्या पोषध, असे अनेक तप झाले आहेत. या तपस्वीचा वरघोडा श्री संघाच्या वतीने काढण्यात आला. या मध्ये हजारो नागरीक सहभागी झाले होते. या ठिकाणी चार्तुमासच्या पहिल्या दिवसा पासून अखंड नवकार महामंत्र जाप करण्यात आला.सुखसागरनगर व कोंढवा येथील जैन समाज एकत्र येवुन ऐैतीहासीक असा चातुर्मास चालु आहे. पजुषण पर्वातील महत्वाच्या अशा संवत्सरीच्या दिवशी जवळपास ५००० लोकांच्या उपस्थितीत क्षमापनाचा कार्यक्रम संपन्न झाला . अशी माहिती संघाचे अध्यक्ष पुखराज हिरण व कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक गोलेची यांनी दिली.

Advertisement

मा. आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित राहून गुरु महाराजांचे आशीर्वाद घेतले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक गोलेचा, विजय नहार, राजकुमार लोढा, नितीन मंडलेचा, अशोक सालेचा, प्रदीप बोरा, प्रमोद कांकरिया, किरण संचेती, सागर राका, गणेश चोरडिया, नितीन चोरडिया, मनीष ओस्तवाल, वैभव धोका,शेवंतीलाल लुंकड मनोज धोका, पंकज चुतर प्रमोद संचेती देवेंद्र बोरा, महावीर छाजेड , ललित कटारिया यांनी प्रयत्न केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page