*राष्ट्राच्या उभारणीत महिलांचे योगदान मोठे- प्राचार्य डॉ. संभाजी मलघे* *इंद्रायणी महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न*
तळेगाव दाभाडे:
राजमाता जिजाऊ मासाहेब, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, मदर तेरेसा इत्यादी कर्तुत्वान महिलांचे कार्य पाहता राष्ट्राच्या उभारणीत महिलांचे योगदान निश्चितच आहे, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी जागतिक महिला दिनाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सदस्या सौ. निरुपा कानिटकर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोते, उपप्राचार्य संदीप भोसले, श्री . गोरख काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य मलघे पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा खूप मोठा आहे. शिक्षण ,राजकारण, समाजकारण, कला, संस्कृती, क्रिडा या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी उंच भरारी घेतली आहे. यावर्षी जागतिक खो-खो स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाची प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखाली भारताने खो खो स्पर्धेमध्ये बाजी मारून विश्वचषक जिंकला ही बाब महिलांच्या कर्तुत्वाला निश्चितच अधोरेखित करणारी अशी आहे. चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन महिला निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ लागल्या आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ निरूपा कानेटकर यांनी सांगितले की, महिलांना आधुनिक युगात यशस्वी होताना स्वतः मधील स्त्रीपण आणि स्त्री सुलभ विचारांची जोपासना करणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला देखील दिला.
यावेळीइंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय रामदास काकडे व कार्यवाह मा. चंद्रकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘खेळ रंगला पैठणीचा’ असा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व महिला प्राध्यापिकांनी खेळांमध्ये भाग घेऊन मनमुराद आनंद लुटला. खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमातील विजेते
प्रथम क्रमांक – प्रा.ऐश्वर्या शिंदे
द्वितीय क्रमांक -प्रा. पूजा तल्लूर
तृतीय क्रमांक – प्रा. प्राची भेगडे
यांनी खिलाडू वृत्तीने सहभागी होऊन पारितोषिक मिळविले. विजयी स्पर्धकांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा.गाडेकर व प्रा विद्या भेगडे यांच्या हस्ते बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिप्ती कन्हेरीकर यांनी केले, तर आभार उपप्रचार्य संदीप भोसले यांनी मानले.