शिवकृपा सहकारी पतपेढी तर्फे महिला दिना निमित्त महिला मेळावा उत्साहात शिवसखी सहकार मंडळाचा प्रारंभ

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी ) : येथील शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई यांच्या वतीने शुक्रवारी ( दि. 7 ) आळंदी शाखा कार्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून शिवसखी सहकार मंडळाचा शुभारंभ सोहळा पार पडला. पतसंस्था चळवळीतील महिलांचे योगदान व सक्षम सहभाग वाढविणे. आर्थिक, सामाजिक, सक्षमता / सबलीकरण महिलांच्या उद्योजकतेस प्रोत्साहन देणे व त्यायोगे रोजगार निर्मिती तसेच महिलांना आर्थिक स्वातंत्र मिळवण्यासाठी प्रशिक्षण देणे. गरिबी निर्मूलन, स्त्री-पुरूष समानता, पर्यावरण रक्षण यासारखे प्रश्न मांडून त्यांच्या समस्यांवर संशोधन करणे, पर्याय सुचविणे, शाश्वत विकासाच्या परिपुर्तीसाठी प्रयत्न करणे. या उदात्त हेतूने हे मंडळ काम करणार असल्याचे शिवसखी सहकार मंडळाच्या मुख्य समन्वयक व शिवकृपा सहकारी पतपेढीच्या संचालिका पुनम जगदाळे यांनी सांगितले. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा शारदाताई वडगावकर, माजी नगरसेविका श्रीमती. रुक्मिणी ताई गोरे, डॉ. दिक्षा फाळके, किरण अवधूत पाटील, सुनंदा आवडजी पवळे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बहुसंख्य महिला मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थित महिलांना संस्थेचे मा. पदाधिकारी, संचालक, व अधिकारी यांनी संस्थेच्या विविध सेवा व सुविधांची माहिती दिली खास महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी 540 दिवसांकरीता 9 टक्के व्याज परतावा देणाऱ्या शिवसखी ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले. महिला दिनानिमित्त उपस्थित महिला सभासदांना यावेळी शिवसखी ची ओळख म्हणून शिवसखीची स्कार्प पट्टी, तुळसी वृंदावन, हरिपाठ व गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण, संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी व इतर संचालक यांच्या संकल्पनेतून हा अनोखा जागतिक महिला दिन साजरा झाला. यावेळी शाखा व्यवस्थापक सुधीर भोसले यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देली व शाखेच्या इतर कर्मचारी वर्ग व सर्व दैनंदिन ठेव प्रतिनिधिनी आभार मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page