आजचा तरुण हा उद्याचा भारत घडाविणार इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे यांचे प्रतिपादन
मावळ :
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की आजचा तरुण हा खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडविणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना युवक युवती जेव्हा nss व ncc सारख्या उपक्रमात सहभाग घेतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते आपल्यात श्रम संस्कार व इतर मूल्य शिक्षणाचे बीज रोवत असतात. विद्यार्थ्यांचा पुस्तकी ज्ञानापलीकडचा सर्वांगीण विकास अश्या उपक्रमातूनच होतो असेही ते म्हणाले. आजच्या आधुनिक युगात जगत असताना विद्यार्थांनी कृत्रिम बुद्धिमत्ता चे आव्हान लिलया पेलत असतानाच गांधीजींनी दिलेला “खेड्याकडे चला ” हा कानमंत्र देखील समजून घेतला पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी गेल्या सात दिवसात केलेल्या कामाचा आढावा घेत, विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. या सांगता समारंभास इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त श्री संजय साने हे ही उपस्थित होते त्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी पेठे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ रोहित नागलगाव यांनी केले.