कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूटमध्ये रंगतदार फ्रेशर्स पार्टी!
तळेगाव दाभाडे:
इंद्रायणी विद्या मंदिरच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, तळेगाव दाभाडे येथे दिनांक ६ डिसेंबर २०२५, सायंकाळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रंगतदार फ्रेशर्स पार्टी चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजच्या स्टुडंट काउन्सिलने प्रा. अश्विनी जोशी, प्रा. श्वेता मंत्री आणि प्रा. मुग्धा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
कार्यक्रमाची सुरूवात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, KBIPERचे प्राचार्य डॉ. संजय अरोटे, HOD डॉ. G. S. शिंदे आणि क्रीडा संचालक गोरख काकडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सारस्वती पूजन करून करण्यात आली.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रामदास काकडे, उपाध्यक्ष मा. संजय साने आणि मा. शैलेश शाह, सचिव मा .चंद्रकांत शेटे आणि खजिंदार मा. सौ. निरुपा कानिटकर या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि पुढील शैक्षणिक प्रवासासाठी प्रेरक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आणि स्टुडंट काउन्सिलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी नव्या विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक, आनंददायी आणि रंगतदार वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांसाठी दिलेले प्रेरक संदेश आणि मार्गदर्शन उपस्थितांचे मन भारावून टाकणारे होते.
हा कार्यक्रम KBIPERच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने उत्कृष्ट रीतीने पार पडला.






