कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूटमध्ये नव्या विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत! !
तळेगाव दाभाडे:
इंद्रायणी विद्या मंदिरच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे येथे दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी नवागत विद्यार्थ्यांसाठी भव्य इंडक्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. पायल थोरेत, प्रा. श्वेता मंत्री, प्रा.निलिमा फाटकांगळे आणि डॉ. योगेश झांबरे यांनी केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय अरोटे यांनी केले.
कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी श्री. चंद्रकांत शेटे (Secretary, IVM) होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्थेच्या स्थापनेचा इतिहास, उद्देश आणि महत्त्वपूर्ण कार्यपद्धती सांगितल्या. तसेच त्यांनी स्पष्ट केले की ही संपूर्ण संस्था non-profit अर्थात नफा न कमावणारी संस्था आहे आणि विद्यार्थ्यांचा विकास हेच प्राथमिक उद्देश आहे.
विद्यार्थ्यांसाठी निरुपा कानिटकर (Treasurer, IVM) यांनी संदेश दिला की महाविद्यालय फक्त शिक्षणाचे केंद्र नाही, तर प्रत्येक समस्येत संस्थेने त्यांच्या पाठीशी उभे राहणे सुनिश्चित केले आहे. त्यांनी कृष्णराव भेगडे यांचे योगदानही अधोरेखित केले, ज्यामुळे इंद्रायणी विद्या मंदिर एक आदर्श शिक्षणसंस्था बनली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. ललित गोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत फार्मसी क्षेत्रातील नवनवीन संधी, संशोधनातील महत्व, बदलते तंत्रज्ञान आणि करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी प्रेरक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय रामदास काकडे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी YMC-COE चे प्राचार्य डॉ. पाटील आणि क्रीडा संचालक गोरख काकडे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी HOD डॉ. G. S. शिंदे यांनी आभार व्यक्त करून उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.






