प्रा. राजेंद्र आठवले यांना 2025 चा राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
मावळ :
प्रा. राजेंद्र आठवले यांना 2025 चा राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार रविवार, दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी, अक्षय लॉन्स, शिरवळ सातारा पुणे हायवे येथे प्रदान करण्यात आला.
अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपली समाजाप्रती असलेली निष्ठा, प्रेम ,शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम करत असलेल्या व त्या क्षेत्रातील अनेक गरजूंना दिलासा व आत्मविश्वास देऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य गेले 25 वर्षे अविरतपणे केल्याबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र श्रीमंत आठवले यांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरचा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री केनिथ कीर्तीजी,आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुवर्णपदक धावपटू, केनिया, अविष्कार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. संजय पवार,श्री विवेक गुरव व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री नितीनकुमार भरगुडे -पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला.त्यांना मानपत्र व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्राचार्यांनी, प्राध्यापकांनी व शिक्षकेतरकर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.