*कॉनक्वेस्ट महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात संपन्न*

SHARE NOW

पिंपरी चिंचवड :

महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या चिखली येथील कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध जलतज्ञ आणि महाराष्ट्र विकास केंद्राचे चेअरमन अनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक, एन डी ए प्लास्टिकचे मा. श्री. दामाजी आसबे उपस्थित होते.

शिक्षक हाच देशाचा कणा आहे, शिक्षकांच्याच बळावर पिढ्या घडतात, शिक्षक माणसाला आयुष्यामध्ये ध्येयापर्यंत पोहोचवतो म्हणून संस्थेच्या महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देणे हे आमचे काम आहे. मी सुद्धा माझ्या शिक्षकांमुळे इंजिनियर झालो अशा भावना अनिल पाटील यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांनीही पुढील काळात शिक्षकांचा आदर करण्याचे आवाहन केले.

Advertisement

दामाजी आसबे यांनी सुधा मूर्ती यांचे उदाहरण सांगून कृतज्ञ राहिल्यास फायदे होतात आणि त्याची गरज आहे हे सांगितले.

प्राचार्य प्रदीप कदम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाचा आढावा घेत आदर्श शिक्षकांच्या भूमिका सांगितल्या. शिक्षक म्हणजे केवळ नोकरीं नाही, व्यवसाय नाही तर त्याग, सेवा आणि समर्पण आहे. विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहचवणारा व स्वतः जागेवर राहणारा एकमेव घटक म्हणजे शिक्षक असे प्रा. प्रदीप कदम म्हणाले.

यावेळी सर्व विभाग प्रमुख,रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विदयार्थी विकास अधिकारी, परीक्षा विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र विकास केंद्र संस्था, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक भूमिका जाधव, सूत्रसंचालन पूजा मोरे व विजयालक्ष्मी गायकवाड आणि आभार प्राची खेडकर या विद्यार्थिनींनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page