मावळभूषण कै. कृष्णरावजी भेगडे साहेबांना इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कांतीलाल शहा विद्यालय कुटुंबाकडून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण
तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि मावळ भूषण कै. कृष्णरावजी भेगडे साहेब यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण मावळ परिसरावर शोककळा पसरली आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कांतीलाल शहा विद्यालय, तळेगाव स्टेशन येथे भेगडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी विद्यालयाचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कै. भेगडे साहेब हे विद्यालयाचे आधारस्तंभ होते. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य व प्रेरणादायी आहे. त्यांचे निधन ही केवळ शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण मावळसाठी एक मोठी हानी आहे.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करत त्यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.