संतोष परदेशी यांची रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षपदी निवड
तळेगाव दाभाडे: रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या चार्टर अध्यक्षपदी संतोष शांताराम परदेशी. उपाध्यक्षपदी प्रशांत रामचंद्र ताये. यांची तर सचिव पदी प्रदीप टेकवडे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांचा चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभ डिस्टिक गव्हर्नर शितल भाई शहा. डी आय जी वैभव निंबाळकर. आमदार सुनील शेळके.माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे. ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे.या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक १५जुन २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सुशीला मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे या ठिकाणी होणार आहे. रोटरी क्लब ऑफ गोल्डन चे अध्यक्ष संतोष परदेशी. उपाध्यक्ष प्रशांत ताये. सचिव प्रदीप टेकवडे. या तीनही मान्यवरांना विविध सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आहे. रोटरी क्लब ही जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे. तळेगाव दाभाडे शहरात विविध प्रकारची सामाजिक कार्य व सेवा करण्याची संधी या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते( भारत सरकार). आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोफत डॉक्टरकीची सेवा देणारे. अनाथ मुलांचे पालन पोषण करणारे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई यांना समाजसेवा रत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. प्रोजेक्ट चेअरमन दीपक फल्ले. निमंत्रक किरण ओसवाल यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संतोष परदेशी. प्रशांत ताये. प्रदीप टेकवडे यांच्या निवडीचे विविध स्तरातून सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.