सिंहगड सिटी स्कुल कोंढवा टिळेकर नगर येथील शिक्षकांचा संप ! विद्यार्थी, पालक यांना कोणतीही पुर्व कल्पना नाही… विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीसाठी जबाबदार कोण?
कोंढवा पुणे :
गेली अनेक महिने पगार झाला नाही म्हणून गेली तीन-चार दिवसांपासून शिक्षक, वर्गात न जाता मैदानात आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थी देखील शाळेत जायला नको असे पालकांना वारवर सांगत आहे.मुख्य परीक्षेला पंधरा दिवस बाकी असताना विद्यार्थ्यांची नकारात्मक मानसिकता पाहून पालक देखील हैराण झाले आहेत.
सिंहगड सिटी स्कुल टिळेकर नगर येथे सीबीएसई माध्यमाची शाळा आहे.या शाळेतील सुमारे चाळीस हून अधिक शिक्षक वर्गात न जाता खेळाच्या मैदानावर बसत आहेत.या संदर्भात पालकांना विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली असता पालकांनी स्वतः शाळेत जाऊन खात्री केली असता सर्व शिक्षक उपोषणासाठी एका झाडाखाली बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आमचे शिक्षक वर्गात येत नाहीत. या मुलांच्या सांगण्यावरून पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले असता प्रशासनाकडून उडवा उडवीचि उत्तरे दिली जात आहे.
हजारो विद्यार्थी या सिंहगड शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून दरवर्षी अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये भरमसाठ फी देखील पालकांनी भरलेली आहे.सर्वसामान्य कुटुंबातील अनेक गरीब पालक आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी काबाडकष्ट करून फी भरतात. आज त्यांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे पालक संतापलेले पाहावयास मिळत आहे.
पालक आतून शाळे विषयी तीव्र संताप व्यक्त होत असून मुख्याध्यापिका व शाळा प्रशासन या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत.आम्ही आमची मुले हजारो रुपये भरून पाठवतो मग आमच्या मुलांना चोरसारखी वागणूक का? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सिंहगड स्कूलच्या मुख्याध्यापिका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न सुरू असून लवकर हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.याबाबत प्रतिक्रिया देताना पालक हर्षद देशमुख. यांनी सांगितले की माझा पाल्य सांगतो की सर वर्गात येत नाहीत त्यामुळे मी शाळेत जाणार नाही मुलं खूप गोंधळ करतात. हे पाहण्यासाठी मी शाळेच्या समोर आलो तर मला सर्व शिक्षक मैदानात बसलेले दिसले मात्र हा संप कधी सुरू झाला? का सुरू आहे? या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही.
तर प्रविण ताकवले पालक यांनी सांगितले की,
विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे ती भरली नाही तर त्यांनी पेपर दाखवले नाहीत आम्ही काबाडकष्ट करून हजारो रुपये फी भरतो मग विद्यार्थ्यांबाबत ही वागणूक शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थेने का द्यावी. शिक्षकांचा प्रश्न तात्काळ मिटावा. व आमच्या विद्यार्थ्यांचे चार दिवसापासून झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे.
मुलांना सीबीएससी सारखे उच्च शिक्षण मिळावं म्हणून आम्ही मोल मजुरी करून आम्ही हजारो रुपये फी भरतो आणि शाळा आणि शिक्षक वर्गात जात नाहीत मुलं शाळेत यायला तयार नाहीत ऐन परीक्षेच्या तोंडावर मुलांमध्ये अशी भावना निर्माण होणे चुकीचे आहे असे मत सुरेखा धायगुडे महिला पालक यांनी व्यक्त केले.