*तळेगाव येथील विद्यालयांस आदर्श विद्यालय पुरस्कार जाहिर*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पु.वा.परांजपे विद्यालय आणि नवीन समर्थ विद्यालय या दोन विद्यालयांस संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे(ग्रामीण)च्या वतीने आदर्श विद्यालय म्हणून निवड केली आहे. हे दोन्ही विद्यालये मावळ तालुक्यात उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.समाज सामाजिक संस्था व औद्योगिक संस्थांच्या मदतीतून ही उत्कृष्ट विद्यालये उभी केली आहेत हे करीत असताना नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक या विद्यालयांच्या उभारणीमध्ये सक्रिय आहेत निकालाची उत्कृष्ट परंपरा,भौतिक सुविधा,गुणवत्ता आणि समाज प्रबोधन मध्ये ही विद्यालये अग्रेसर असल्यामुळे पु.वा.परांजपे आणि नवीन समर्थ विद्यालयांस आदर्श विद्यालय पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.आणि ते लवकरच प्रदान करण्यात येणार आहेत.