देहूरोड परिसरात अनियमित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांची तक्रार; तात्काळ उपाययोजनेची मागणी

SHARE NOW

देहूगाव :

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना होत असलेल्या अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. संबंधित निवेदनात “नियमित पाणीपुरवठा सुरू करावा तसेच पाईपलाईन दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घ्यावीत” अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार श्री. परशुराम कृष्णा चौधरी (रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाणीपुरवठा वेळेवर होत नसून दाबही कमी आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत पाणी न आल्याने घरगुती कामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Advertisement

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही भागांत पाईपलाईन गळती व तांत्रिक बिघाडामुळे पाणी वाया जात आहे. या समस्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.

या संदर्भात शंकर दोडमणी ,दुधेश्वर राम,नरेश कांबळे , उस्मात शेख ,जब्बर खान ,सलीमुन शेख ,गुलफ्रिजा रंगरेंज, कविता कांबळे ,दुर्गमा कुऱ्हाडे यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, गळतीच्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि वेळापत्रकानुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा पुढील काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

सदर तक्रार देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात सादर करण्यात आली असून, पोहच अशी नोंद ३ जून २०२६ रोजी करण्यात आली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page