पवना ज्युनिअर कॉलेजचे उज्वल यश
पवनानगर ता.२२ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल ( काल ता.२१) दुपारी जाहीर झाला असून यामध्ये पवना ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पवनानगर येथील कॉलेजने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.विज्ञान शाखेचे हे तिसरे वर्ष असून तीनही वर्षे या विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली
निकाल खालीलप्रमाणे
*विज्ञान विभाग – १०० टक्के निकाल*
प्रथम क्रमांक – कालेकर ओंकार कैलास – ६९.६७%
व्दितीय क्रमांक – कालेकर सार्थक मारुती – ६७.३३ %
तृतीय क्रमांक – कडू किरण काशिनाथ – ६०.५० %
*वाणिज्य विभाग – ९४.८२ टक्के*
प्रथम क्रमांक – कु.खराडे रोशनी संतोष -६७.८३%
व्दितीय क्रमांक – काळवीट सोनाली शंकर – ६६.५०%
तृतीय क्रमांक – कु.तुपे विना लहू – ६५.६७%
*कला विभाग – ६३.८८ टक्के*
प्रथम क्रमांक – कु.ढोरे अंकिता दत्तात्रय – ७४.७३%
व्दितीय क्रमांक – घारे अक्षदा सुनील – ६६.१७%
तृतीय क्रमांक – कु.सुतार साक्षी सुभाष – ६२.६७ %
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे , सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले