जुलमी कर वाढीविरोधात संतप्त प्रतिक्रिया; तातडीने निर्णय मागे घेण्याची मागणी

SHARE NOW

देहूगाव : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने घनकचरा व्यवस्थापन शुल्कात केलेल्या वाढीव निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सन २०२६ ते २०२७ या कालावधीसाठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व मिळकतधारकांवर सरासरी १५ ते २० टक्क्यांनी कर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‘स्वच्छता अभियान’ अंतर्गत दरवर्षी प्रति मिळकत सुमारे २४०० रुपये ‘यूजर फी’ आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ही वाढ अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे. स्थानिक प्रशासनाने नेमलेल्या प्रतिनिधींमार्फत हा निर्णय घेताना सर्वसामान्य नागरिकांचा विचार करण्यात आलेला नसल्याची टीका होत आहे. वाढीव कराचा बोजा सर्वसामान्यांवर टाकला जात असून, या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

Advertisement

नागरिकांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला तातडीने बैठक बोलावून हा वाढीव कर रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरिकांवर केलेली जुलमी कर वाढीच्या विरोधात सर्व राजकीय पक्षाच्या वतीने ही कर वाढ रद्द करण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. रमेश जाधव, संदीप बालघरे शहर प्रमुख शिवसेना( उ बा ठा,) दिपक चौगुले शिवसेना शहर प्रमुख ( शिंदे गट ) , शशिकांत सप्पागुरू शिवसेना, मोजेस दास, डोमाणिक दास मनसे, अरविंद गायकवाड, श्रीमंत शिवशरण, इंद्रपाल रत्तू,रिपब्लिकन पार्टी ,बबन टोम्पे, गोपाळ राव, किशन बोत पंडित,काँग्रेस आय ,मलिक शेख,युवक काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड तुकाराम जाधव, रामभाऊ सावंत, भाजपा नेते उपस्थित होते


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page