पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तळेगांव दाभाडे शहरात व्हावे.
तळेगाव दाभाडे:
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष संपूर्ण भारत देशात विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न होत आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भारतीय प्रशासकीय,धार्मिक, सामाजिक, महिला सबलीकरण, अनिष्ट प्रथा परंपरा बंद करणे व इतर अनेक गोष्टींचा विचार करता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आपल्या तळेगांव दाभाडे शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून व्हावे.
याकरिता मा.राज्यमंत्री श्री.बाळाभाऊ भेगडे,नगराध्यक्ष श्रीसंतोषजी दाभाडे पाटील, नगरसेवक श्री. इंदरकुमार ओसवाल मुख्याधिकारी श्री.धापपेकर साहेब,उपमुख्याधिकारी ममता राठोड यांना
श्री.शेखर गुंड,श्री.दर्शन गुंड, नितीनजी पोटे,श्री.रमाकांत कवितके,श्री.रविंद्र कोकाटे,श्री. गौरव गुंड,श्री.सुयोग पिंगळे,श्री.मयुर पिंगळे,कु. सुमित गुंड,श्रीमती.हेमलता पिंगळे,सौ.शितल मयुर पिंगळे यांनी या संदर्भात निवेदन पत्र दिले.
यापत्रावर मा.श्री.बाळाभाऊ भेगडे यांनी आपले पत्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देऊन सदर विषय लवकरात लवकर पूर्ण करावा असे नमूद केले याबद्दल महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री.प्रा.राम शिंदे सरांनी देखील सूचना देऊन सदर स्मारकासाठी शासन स्तरावर मदत करण्याचे आश्वासन दिले.






