सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

शिक्षणक्रांतीच्या जननी, स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक, थोर समाजसुधारीका कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त एस. एन. डी. टी महिला विद्यापीठाच्या जानकीदेवी बजाज इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

अँड रिसर्च, पुणे या संस्थेत मोठ्या उत्साहाने जयंती सोहळा संपन्न झाला. या कार्यकमाचे प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व व्याख्यात्या स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांचे सावित्रीबाईच्या शैक्षणिक व सामाजिक विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतीबा फुले यांना समर्थपणे साथ देत १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाडयात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली व शिक्षणाची व्दारे खुली केल्यामुळे महिला आज सर्वच ठिकाणी नेतृत्व करताना दिसतात. आधुनिक काळात नारी सबसे भारी है’ या उक्तीनुसार महिलांच्या सबलीकरणाचे सर्व श्रेय हे

महिलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते असे स्नेहल बाळसराफ यांनी प्रतिपादन केले. या कार्यकमाचे अध्यक्षस्थान पोर्णिमा मेहता, सदस्य व्यवस्थापन परिषद, यांनी भूषविले तर डॉ. संतोष आपटे, डॉ. महेश कोलताम, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक, पालक,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement

त्याचप्रमाणे जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यकम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा या ठिकाणी आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. नगराध्यक्षा सुजाता मधुकर काजळे यांच्या शुभहस्ते स्नेहल बाळसराफ यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देताना समाजातील अंधश्रध्दा ,वाईट रुढीपरंपरा दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी

केलेल्या अथक परिश्रम व त्यागाची माहिती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने बालहत्या प्रतिबंध, बालसंगोपन केंद्र, विधवाविवाह, केशवपन पध्दती, आंतरजातीय विवाह या विषयी माहिती देवून महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे पेलली असे सांगून त्यांनी केलेले लेखन व दुष्काळनिवारण केंद्राची स्थापना करुन प्लेगच्या साथीत खऱ्या अर्थाने माणूसकीचे धडे

दिले असे सांगून सावित्रीबाई बंडखोर स्त्री म्हणून धाडसी निर्णयाची माहिती दिली. कार्यकमाचे प्रास्ताविक नगरसेविका अलका शिवाजी फुलपगार यांनी केले . मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी कार्यकमाचे नियोजन केले. याप्रसंगी डॉ. दत्तात्रय बाळसराफ, नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्यने

सहभागी होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page