मंगेश डान्स अकॅडमी आयोजित “मावळ डान्स आयडॉल” तालुकास्तरीय डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाली

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

दिनांक 31 मे 2026 रोजी माऊली मंगल कार्यालयामध्ये तालुकास्तरीय डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते श्री. भरत नाना राजीवडे ..उद्योजक श्री. विजय सरस ..महिलाध्यक्षा: रा. काँ. दिव्यांग सेल मावळ तालुका सौ. ज्योतीताई भरत राजीवडे ..माळवाडीचे उपसरपंच श्री. विदुर पचपिंड वडगाव बार असोसिएशनचे सचिव अँड .अमोल दाभाडे उद्योजक श्री. संतोष डिखळे.. हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.भरत नाना राजीवडे यांनी आपल्या मनोगतात मंगेश सरांला जिल्ह्यात स्तरीय डान्स स्पर्धा घ्या तो कार्यक्रम आपण चांगला मोठा करू असे आश्वासन दिले व पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व स्पर्धकांचे आभार मानले जवळपास 90 होऊन अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतले होते त्यापैकी बहुतांश डान्सर हे टेलिव्हिजन वरती आपला परफॉर्मन्स केलेली मुलं त्यामध्ये होती.

Advertisement

स्पर्धा ही दोन वयोगटात झाली लहान गटामध्ये प्रथम क्रमांक तनिष्का घोपला.. द्वितीय क्रमांक ..शौर्य कुलकर्णी… तृतीय क्रमांक.. हर्षिता कदम.. तसेच खुला गट.. प्रथम क्रमांक.. फैजल खुरेशी …द्वितीय क्रमांक …प्रदीप गुप्ता …तृतीय क्रमांक… सृष्टी कनोजिया… यांनी पटकावला स्पर्धेचे परीक्षण तुषार गोरगर… अक्षय पिठले …स्नेहल दिघे …यांनी केले

स्पर्धेसाठी खूप लांबून स्पर्धक आले होते त्यांच्यासाठी मावळ तालुका दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्ष सौ ज्योतीताई राजुरे यांनी बिस्कीट पुढे व पाण्याची व्यवस्था केली होती प्रत्येक स्पर्धकाला सर्टिफिकेट देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश शिंदे यांनी केले व कार्यक्रमाचे चित्रीकरण विपुल शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे आभार मंगेश डान्स अकॅडमी चे सर्वेसर्वा मंगेश साळुंखे यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी जयेश हुलावळे ..हेमंत पानसरे ..प्रणील चव्हाण ..अंकित पाटील ..सपना सस्ते ..निखिल खलसे.. अनिमेष भाईसार.. मयुरेश कांबळे …प्रशिक गवई.. व ग्रामस्थ ..पालक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page