भेगडे तालीम गणेश मंडळ अध्यक्षपदी समीर भेगडे
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील भेगडे तालीम सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाच्या २०२५ या वर्षासाठी अध्यक्षपदी समीर भेगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबरोबरच नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले हे मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आले आहे. माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल सुरू आहे.
नूतन कार्यकारिणी : अध्यक्ष : समीर भेगडे, उपाध्यक्ष गणेश भेगडे, अभय भेगडे, महेश काकडे, अजिंक्य सातकर, मितुल भेगडे, सुमित लांजेकर, खजिनदार : शुभम लांडे, सहखजिनदार: देवेश भेगडे, प्रतीक भेगडे, अक्षय पाटोळे, स्वराज भेगडे, राहुल गरुड, अजय पवार, सरचिटणीस : शिवम भेगडे, चिटणीस : दर्शन भेगडे, दीपेश जाधव, ओम भेगडे, सार्थक भेगडे, विराज भेगडे, साहिल भेगडे, प्रसिद्धी प्रमुख : प्रथमेश भेगडे. आदींची नियुक्ती करण्यात आल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.






