श्री. किरण घोरतळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

SHARE NOW

कोंढवा

कोंढवा भागातील गेल्या 50 वर्षापासुन विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असलेल्या मिलिंद तरुण मंडळ ट्रस्ट कोंढवा यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” हा राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय गोकुळ नगर पुणे येथे कार्यरत असलेले गुरूवर्य, दैनिक लोकमतचे पत्रकार, आदर्श शिक्षक श्री. किरण काकासाहेब घोरतळे पाटील यांना देण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयात घेतलेले अनेक उपक्रम, शालेय साहित्य वाटप कार्यक्रम, विद्यार्थीभिमुख अध्यापन, नव नवीन शैक्षणिक उपक्रम, दर्जेदार शिक्षण व डिजिटल अध्यापन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या कार्याची दखल घेऊन त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिकेत जगताप

यांनी सांगितले.

 

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विधान परिषदेचे आमदार श्री. योगेश टिळेकर,

मा. नगरसेवक वीरसेन बापू जगताप, सामाजिक कार्यकर्ते अमित जगताप मनसे शाखाध्यक्ष ,मंडळाचे अध्यक्ष अनिकेत जगताप,

सामाजिक कार्यकर्ते चिंतामण तात्या जगताप, अशोक दादा जगताप, भीमराव जगताप, एडवोकेट योगेश कापरे पाटील, विशाल कामठे, जयसिंग शिंदे

Advertisement

आदी मान्यवर उपस्थित होते. *यावेळी जेष्ठ पत्रकार तथा आदर्श शिक्षक श्री. किरण घोरतळे सरांचे उपस्थित सर्व नागरिक, पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या*

 

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, आपल्या कात्रज- कोंढवा या भागात गेल्या अनेक वर्षांपासून किरण घोरतळे सर हे पवित्र ज्ञानदानाचे करत असलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य हे उल्लेखनीय आहे. विद्यार्थी हितासाठी विविध शैक्षणिक उपक्रम ते राबवतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार निश्चित त्यांच्या कार्याचा गौरव करणारा आहे. त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे, राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी, सचिव दिलीप शेठ परदेशी, संचालिका प्रतिभा नाईक, राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे सर, राधाकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरुण डमाळ सर तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page